पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील श्री बालाजी पार्कच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रयत्नातून शासनाकडून १० कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे.
पारोळा शहरातील श्री बालाजी मंदीर हे प्रतितिरूपती म्हणुन महाराष्ट्रभर प्रख्यात आहे. सध्या शहरात नवरात्रोत्सवासह ब्रम्होत्सवाची मोठी धामधुम सुरू आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर शहरातील मुख्य रस्त्यांवर आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या दुरदृष्टीने विद्युतीकरणाचा आधारे शहरातील लख्ख लख्ख प्रकाश मुख्य आकर्षण ठरत आहे.
सर्वत्र ब्रम्होत्सवाचा मोठा जल्लोष सुरू असतांना श्री बालाजी स्वयंसेवक व श्री बालाजी भक्तांचा मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातुन आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन श्री बालाजी पार्कचा सर्वांगिण विकासासाठी तब्बल १० कोटी रूपयांचा निधीला मंजुरी मिळाली आहे. यात भक्तनिवास, श्री बालाजी स्वयंसेवक कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशव्दार, पेव्हर ब्लॉक, प्रसादालय यांसह विविध विकासकामांचा समावेश आहे. श्री बालाजी मंदीर हे महाराष्ट्रासह जगभरात पर्यटन स्थळ म्हणुन अवतरावे यासाठी आवश्यक त्या सर्वच उपाययोजना येथे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.
श्री बालाजी स्वयंसेकांचा मागणीची तातडीने दखल घेवुन श्री बालाजी मंदीरासह शहराच्या वैभवात मोठी भर घालण्याचे काम केले असुन श्री बालाजी पार्क परिपुर्ण विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल अमोल पाटील यांचा श्री बालाजी स्वयंसेकांचा वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.