आपत्तीग्रस्त आसाम व केरळला महाराष्ट्राकडून १० कोटीची मदत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या आसाम व केरळला महाराष्ट्र सरकारने २० कोटी रुपये मदत दिली आहे. आसाम आणि केरळमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात भूस्खलन होऊन शेकडो लोक मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले आहेत.

जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आसाम आणि केरळ या २ राज्यांना प्रत्येकी १० कोटींची मदत केली आहे. या पूर्वी गुजरातसह अन्य राज्यांनाही महाराष्ट्र सरकारकडून मदत देण्यात आली आहे.

 

Protected Content