मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून ६६ लाखांची रोकड जप्त केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूकांची शनिवारी घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर सगळ्यात जिल्ह्यांत कडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही आचारसंहिता लागू होताच मोठी कारवाई केली आहे. तब्बल 67 लाख रुपये मुंबईच्या एलटी मार्ग परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. एका कार्यालयातून ६६ लाख रुपये सापडले. या परिसरात आणखी काही ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. छाप्यामध्ये हस्तगत केलेली रक्कम आणि त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्यात आला असून त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिली.