अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आमदार अनिल पाटील यांच्या कार्यामुळे अमळनेर मतदारसंघातील निधी आणि विकासकामांचा आलेख वाढत असतानाच आता पुन्हा आमदारांना अल्पसंख्याक विकास विभागाकडून सुमारे 1 कोटींचा निधी मिळाला असून या माध्यमातून शहर व ग्रामीण भागामध्ये 50 लाखांची विकासकामे होणार आहेत.
निधीचे वितरण करताना आमदार पाटील यांनी शहर व ग्रामीण भागात जवळपास समानता ठेवल्याने दोन्हीकडे विकासाचा समतोल राखला जात आहे.अल्पसंख्याक विकास विभागातर्फे दि 31 मार्च रोजी शासन आदेश निघाले असून यात राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे,यात अमळनेर मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने खालील विकासकामांचा समावेश झाला आहे.
ही होणार विकासकामे
शहरी भागासाठी अमळनेर नगरपरिषद हद्दीत बंगाली फाईल भागात सामाजिक सभागृह बांधणे 20 लक्ष,न प हद्दीत जपान जीन भागात सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष आणि न प हद्दीत खारोट कब्रस्थान येथे संरक्षण भिंत बांधणे 20 लक्ष आदी 50 लक्ष ची कामे मंजूर झाली आहेत. ग्रामीण भागात शिरसाळे येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 15 लक्ष, मांडळ येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 15 लक्ष, शिरसोदे येथे सामाजिक सभागृह (शादीखाना) बांधणे 10 लक्ष आणि शेळावे बु येथे कब्रस्थान ला संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष आदी 50 लक्षची कामे मंजूर झाली आहेत.
सदर आवश्यक विकासकामांना मंजुरी मिळाल्याने आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांचे विशेष आभार मानले तर विकासकामे मंजूर झालेल्या संबधित गावांसह शहरातील नागरिकांनीही आमदारांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.