जळगाव (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर तपासणी पथकाने रेल्वे गाड्यांमधील व स्थानकावरील फुकट्या प्रवाशांविरुद्ध तसेच अतिरिक्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आज (दि.२४) विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहीमेत तब्बल ३५९ प्रकरणात कारवाई करण्यात येवून एकूण १,७७,१७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही मोहीम वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या पथकात २८ तिकीट निरीक्षक व ०१ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत बिना तिकीट यात्रा करणाऱ्या ६३ जणांकडून २८,३५५ रुपये दंड, अनियमित यात्रा करणाऱ्या २९५ जणांकडून १,४८,१७० रुपये, नोंद न केलेला सामान नेणाऱ्या एकाकडून ६५० रुपये दंड अशाप्रकारे या विशेष मोहिमेत एकूण केसेस ३५९ जणांकडून १७७१७५ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये तिकीट तपासणी स्टाफ बी.एस. महाजन, मोहमद रफ़ीक, उमेश कलोसे, एन.पी. पवार, एन.पी. अहिरराव, प्रशांत ठाकुर, ए.एस. गायकवाड, एम्.के. श्रीवास्तव, एस.के. वर्मा, हेमंत सावकारे, पी.एम्. पाटिल, एम्.के. राज, एस.व्ही. त्रिवेदी, एम्.पी. नज़राकर, व्ही.के. संचन, सी.आर. गुप्ता, एस.एन. चौधरी, एस.पी. मालपुरे, व्ही.डी. पाठक, एस.ए. दहिभाते, धीरज कुमार, वाय.डी. पाठक आणि सर्व तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते.