भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळचे रेल्वे स्टेशन नेहमी गजबजलेले रेल्वेस्टेशन असते. परंतु, २३ मार्च पासून या रेल्वे स्टेशन वरती पूर्ण शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. परंतु, आज नाशिक येथून ८५० परप्रांतीयांना घेऊन जाणारी पहिली ट्रेन भुसावळ येथे थोडा वेळ थांबून भोपाळकडे रवाना झाली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात २३ मार्च रोजी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉक डाऊनच्या काळात सर्व दळणवळणाची साधने बंद करण्यात आली होती. मात्र, या लॉक डाऊनच्या काळात सर्वच उद्योग व्यवसाय बंद असल्याने बाहेर राज्यातून आलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. या मजुरांना घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी पायी आपल्या गावाचा रस्ता धरला होता. त्यांची अडचण समजून परप्रांतीयांसाठी स्पेशल ट्रेन आज नाशिक येथून सोडण्यात आली. या ट्रेनचे सुमारे १ वाजून ३० मिनिटांनी भुसावळ येथे आगमन झाले. व थोड्या वेळानंतर भोपाळ येथे जाण्यासाठी रवाना झाली. लॉक डाऊन झाल्यापासून प्रवासी वाहतूक ट्रेनची बंद होती. परंतु, आज ही प्रवासी वाहतूक करणारी पहिलीच ट्रेन भुसावळ रेल्वे स्थानकातून पुढे रवाना झाली आहे.