चाळीसगाव, प्रतिनिधी | फ्लॅट घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये असे सांगून २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, धुळे शहरातील शारदा नगर येथील २२ वर्षीय विवाहितेला पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ पती सुमित कृष्णा जाधव, सासरे कृष्णा उत्तम जाधव, सासु प्रमिला कृष्णा जाधव व नणंद गौरी जाधव आदींनी केल्या. सुरूवातीला घरात विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. मात्र नंतर पाच लाख माहेरून घेऊन ये असे सांगून तिला गर्भपाताच्या गोळ्या सासरच्या मंडळींकडून दिल्या जात होते. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पतीकडून अनैसर्गिक संभोग करण्यात आले असल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. तत्पूर्वी ८ जानेवारी २०२० ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत विवाहितेला अमानवी वागणूक देण्यात आली. या सर्व गोष्टीला कंटाळून विवाहितेने मेहूणबारे पोलिस स्थानकात भादवी कलम- ३७७, ४९८ अ, २९४, ३२३, ३४३, ५०४, ५०६, ३४ अशा विविध कलमान्वये पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास प्रकाश चव्हाण हे करीत आहेत.