२७६ वर्षाची धार्मिक व पारंपरिक भावना जपत शेंदूर्णी येथे ओढला ५ पाऊले रथ

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर काही प्रमाणत निर्बंध लादून साजरे करण्याची परवानगी देण्यात येत आहे. याच प्रमाणे आज शेंदुर्णी येथील २७६ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव केवळ पाच पावले रथ ओढून साजरा करण्यात आला.

पाच पुजाऱ्यांनी रथ असलेल्या जागीच रथाचे पूजन करून पाच पावलं रथ ओढण्यात आला. यावेळी रथाला झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. पालखी पूजनही करण्यात आले. अमृत खलसे, सौ विजया खलसे, योगेश गुजर व सौ.वृषाली गुजर, पंडित जोहरे व सौ.रजनी जोहरे, तुषार भगत व सौ. योगिता भगत अश्या पाच जोडप्यांनी रथाचे मंत्रोपचारात पूजन केले. त्रिविक्रम मंदिर पुजारी तुषार भोपे यांनी मंत्रोपचार म्हटले.

यावेळी कडोबा महाराज संस्थान गादी वारस हभप शांताराम भगत,हभप कडोबा माळी, निवृत्ती भगत, राजेंद्र पवार, माजी सरपंच सागरमल जैन, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, माजी प.स.सदस्य सुधाकर बारी, पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, उपपोलिस निरीक्षक देवडे, उप पोलिस निरीक्षक चेडे यांच्यासह हभप रामेश्वर महाराज व भजनी मंडळ,भालदार चोपदार गजानन चव्हाण, विजय सोनार,व भक्तगण उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करण्यासाठीचे आवाहन अभंग रुपात कवी वसंत जावळे यांनी बॅनर द्वारा केले होते. गेल्या पावणे तीनशेहून अधिक काळापासून येथील रथोत्सव परंपरा अखंडितपणे सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रथोत्सव मोठ्या प्रमाणत साजरा न करता केवळ मोजक्या लोकांमध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी रथोत्सव पहावयास न मिळाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

Protected Content