२४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद ; कोरोना रुग्णांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना रविवारी भारताने इराणला मागे टाकले. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत आता दहाव्या क्रमांकावर गेला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या कोरोनाचे एकूण २८ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात भारतात तब्बल ६ हजार ९७७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ मानली जाते. याच कालावधीत १५४ कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. सोमवार २५ मे सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.

Protected Content