Home आरोग्य १६ कोरोना संशयितांच्या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह

१६ कोरोना संशयितांच्या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह

0
25

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात २० व २१ एप्रिल रोजी दाखल झालेल्या १६ कोरोना संशयितांच्या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

दिनांक २० व २१ एप्रिल रोजी कोविड१९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी १६ व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

काल रात्रीच अमळनेर येथील मृत झालेली महिला आणि तिचा पती कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती. तथापि, यानंतरचे १६ नमुने निगेटीव्ह आल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound