१५ वित्त आयोगातून कोरोना उपायासाठी खर्चाची परवानगी द्या ; बिडिओंना निवेदन

 

 

रावेर : प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलींडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे केली आहे.

 

ऑक्सिजन वेळेवर न मिळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यु होत आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात  ऑक्सिजन सेंटर बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना पेशंटचे  हाल होत  आहेत  रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन  सिलिंडर  व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या कडे केली आहे.

 

गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना निवेदन देतांना पंचायत समिती सभापतींचे पती हरलाल कोळी , उपसभापतींचे पती संदीप सावळे ,  सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, सचिव महेंद्र पाटील, सरपंच गणेश महाजन, सरपंच निळकंठ चौधरी, श्रीकांत महाजन , किर्ती पाटील, योगेश पाटील, अमोल पाटील, स्वप्निल पाटील, धनराज पाटील, मंगल वाघोदे आदी  उपस्थित होते.

Protected Content