१० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर नाही ; सीबीएसई बोर्डाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचे स्पष्टीकरण सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आले आहे.
निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचे स्पष्टीकरण सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आल्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे. काही वेबसाईट वर १८ जुलै १२ वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर १० वी इयत्तेचा निकाल १५ ते १७ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्ध करण्यात आले होते.

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षा परिषदने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अद्याप बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचं सांगितलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे. दरम्यान,कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा इतर क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरीही १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, अनेक माध्यमांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने निकालाची बातमी दिली होती. मात्र ‘एएनआय’नेही हे वृत्त मागे घेत असल्याचे नमूद केले आहे.

Protected Content