पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होमलोन मंजुर करुन देतो अशी बतावणी करून कासोदा येथील एकाने पाचोऱ्यातील ४० वर्षीय महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवाशी रेखा संजय पाटील (वय – ४२) ही महिला किराणा दुकान चालवुन आपल्या व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित आहे. रेखा पाटील यांनी नविन घर बांधण्यासाठी होम लोन काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कुणाल सुनिल चौधरी रा. धान्य मार्केट समोर, कासोदा, ता. एरंडोल याने रेखा पाटील यांची होम लोनची फाईल मंजुर करुन देतो असे सांगून त्यांचे कडुन दि. १८ मे २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत टप्प्या टप्प्याने आॅनलाईन ट्रन्झेक्शन वरुन तसेच ५५ हजार रुपये रोख असे एकूण ७५ हजार ९०० रुपये घेतले असुन रेखा पाटील यांनी वारंवार कुणाल चौधरी यांचेकडे होम लोनच्या फाईल बद्दल चौकशी केली असता तसेच दिलेली रक्कम परत करावी अशी मागणी केल्याने कुणाल चौधरी याने पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच रेखा पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये कुणाल चौधरी याचे विरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास पाटील हे करीत आहे.