जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियन मेडिकलच्या अध्यक्षपदी जळगावातील युरोलॉजिस्ट डॉ.अनिल पाटील यांची अध्यक्षपदी तर जनरल सर्जन डॉ. स्नेहल फेगडे यांची खजिनदारपदी निवड झाली आहे.
शिर्डी येथे शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी वार्षिक परिषदेसह सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र आयएमए अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, सचिव डॉ. मंगेश पाटे, प्रेसिडेंट इलेट डॉ.रविंद्र कुटे हे होते. याप्रसंगी हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियन मेडिकलच्या अध्यक्षपदी जळगावातील डॉ.अनिल पाटील यांची अध्यक्षपदी तर डॉ. स्नेहल फेगडे यांची निवड जाहिर करण्यात आली. याशिवाय मागील वर्षी केलेल्या कामाची दखल घेत डॉ.अनिल पाटील व डॉ.स्नेहल फेगडे यांना प्रेसिडेंट अॅप्रीसिएशन अॅवार्डने मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या निवडीबद्दल डॉ.पाटील व डॉ.फेगडे यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यासह जळगाव आयएमएतर्फे अभिनंदन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी निवडीबद्दल शुभेच्छा देतांना सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियन मेडिकल संघटेवर डॉ.अनिल पाटील आणि डॉ.स्नेहल फेगडे यांची निवड ही निश्चितच अभिनंदनास्पद बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रात या दोन्ही डॉक्टरांच मोठ्ठ योगदान राहिलं आहे.
कार्याची दखल, बहुमान प्राप्त
मागील १२ ते १३ वर्षापासून आयएमएमध्ये सक्रीयपणे कार्यरत असल्यामुळे डॉ.पाटील व डॉ.फेगडे यांना मिळालेली ही जबाबदारी हा बहुमान आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा जळगाव आयएमए अध्यक्ष डॉ.दिपक आठवले, सेक्रेटरी डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्यासह सदस्यांनी दिल्यात.