Home क्राईम हॉटेल त्रिमृर्तीजवळील कंम्पाऊंडमधून १ लाखाचा मुद्देमाल चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

हॉटेल त्रिमृर्तीजवळील कंम्पाऊंडमधून १ लाखाचा मुद्देमाल चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

0
102

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी भागातील हॉटेल त्रिमृर्ती शेजारील कंम्पाउड मधून १ लाख रूपये किंमतीचे पी.पी. मल्टीफिलामेन्ट २० धाग्यांचा बंडलाचा अपहार केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सविस्तर माहिती अशी की, नागपूर येथील एस.एस. ट्रान्स लॉजीस्टीक यांच्या नावाचे ट्रान्सपोट वरून राम पॉलीथ्रेड कंपनीच्या मालकीचे पी.पी. मल्टीफिलामेन्ट धाग्याचे २९१ दोऱ्याचे बंडल (जीजे ०५ बीक्स ३८३३) क्रमांकाच्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. हा माल आयशर ट्रकचालक जगदीश देवचंद राठोड रा. गाळण ता. पाचोरा जि.जळगाव याच्याद्वारे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता सुरत येथे रवाना केला. दरम्यान आयशर ट्रक चालक जगदीश देवचंद राठोड याने ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रक व त्यातील माल  हा  जळगाव औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल त्रिमुर्ती शेजारील असलेल्या कंम्पाऊड येथे सोडून दिला. आणि ट्रकमधील १ लाख रूपये किंमतीचे २० धाग्याचे बंडल घेवून अपहार निघून गेला. याप्रकरणी सतबीर रामनिवास शर्मा (वय-५५) रा. सुरक्षानगर, अमरावती, दत्तावाडी ता. नागपूर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात जगदीश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound