हॉकर्सधारकांचा महापालिकेवर मोर्चा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील फुले मार्केट येथील हॉकर्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे हॉकर्सची दुकाने जवळपास एक महिन्यापासून बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉकर्सधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिकेवर शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी ११ वाजता  मोर्चा काढण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात काही हॉकर्सधारक लहान मोठी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या महिन्यांपासून जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने हॉकर्सधारकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांची दुकाने महिनाभरापासून बंदच आहे. त्यामुळे हॉकर्सधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हॉकर्सधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी शिंदे गट आणि हॉकर्सधारक यांनी शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले मार्केट येथून मोर्चा काढून जळगाव महापालिकेवर धडकला. यावेळी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत निषेध करण्यात आला. हॉकर्सधारकांच्या मागण्या येत्या दोन दिवसा सोडवा अन्यथा सोमवारी २६ जून रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी  शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील फुले मार्केट संघटनेचे अध्यक्ष नंदू पाटील यांच्यासह  हॉकर्सधारकांची मोठी गर्दी होती.

Protected Content