हैदराबादेत भाजपला २८ जागांवर आघाडी

 

 

हैदराबाद : वृत्तसंस्था । चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. सुरुवातीला कलानुसार ओवैसी यांचा गढ समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे.

सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती १० जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे हैदराबादमधून भरघोस मतांनी निवडून आलेत.
पोस्टल मतगणना आता जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानंतर बॅलेट पेपरच्या मतदानाला सुरुवात करण्यात आलीय

सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या निकालात भाजप ८८ जागांवर आघाडीवर तर तेलंगणा राष्ट्र समिती ३४ जागांवर आघाडीवर असलेली पाहायला मिळाली. तर स्थानिक खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम पक्ष १७ जागांवर आहे.
निकालाच्या आधीच भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी लक्ष्मीचा एक फोटो ट्विट करत कॅप्शनमध्ये ‘भाग्यनगर’ असं लिहिलंय. निवडून आल्यावर पहिल्यांदा हैदराबादचं नामांतरण ‘भाग्यनगर’ करण्यात येईल, अशी हिंदुत्ववादी घोषणा भाजपनं केली होती.

हैदराबादच्या या निवडणुकीत तब्बल ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरत आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या युतीला इथे केवळ पाच जागा मिळवता आल्या होत्या. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला ९९ तर ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला ४४ जागांपैंकी केवल पाच जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळवता आल्या होत्या.

हैदराबाद महानगरपालिकेत एकूण १५० मतदारसंघ आहेत. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती , १५० मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तर भाजप १४९, काँग्रेस १४६, तेलुगु देसम पार्टी १०६, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ५१, भारतीय कम्युनिस्ट पार्टी १७, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १२ तर इतर पक्ष ७६ जागांवर निवडणूक लढवत आहेत.

 

Protected Content