हैदराबाद वृत्तसंस्था । परतीच्या पावसाने दक्षिण भारतात थैमान घातलं आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह ओडीसात धुवांधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हैदराबादमध्ये आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने परिसरात नदीचे रूप आले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. बोटींच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अतिवृष्टीने घराची पडझड, 9 जणांचा मृत्यू
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये अतिवृष्टीमुळे एक घर कोसळले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी आहेत. याशिवाय मुसळधार पावसामुळे अन्यत्र तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हैदराबादचे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. ओवेसींच्या म्हणण्यानुसार, “हैद्राबाद शहरातील जुन्या भागात बुंदलागुडा मोहम्मदिया हिल्समध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली.