मुंबई (वृत्तसंस्था) नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? डीसीपीच्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि पीडब्ल्यू मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही सर्कस आहे, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रविवारी सुटी असताना मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी बदली रद्दचे आदेश जारी केले. त्यात त्यांनी 10 पोलिस उपायुक्तांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट केले आहे. बदल्या या गृहमंत्र्यांच्या संमतीने झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, सरकारमध्ये समन्वय ठेवण्याची सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सत्ताधारी आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यावरूनच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.