Home आरोग्य हुश्श : भडगावच्या ५९ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

हुश्श : भडगावच्या ५९ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

0
32

जळगाव प्रतिनिधी । भडगाव येथील ५९ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आज सकाळी प्रशासनाने दिली असून यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी प्रेस नोट जारी करून कोरोनाबाबतची माहिती दिली आहे. यानुसार-भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या ५९ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या रूग्णांचे आप्तजन तसेच्या त्यांच्या परिसरातील रहिवासी व संपर्कात आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येत असून लक्षणे पाहून यातील संशयितांचे स्वॅब घेऊन त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने भडगाव येथील रूग्णांच्या संपर्कातील या ५९ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.


Protected Content

Play sound