धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सातखेडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्याच्या पैशांची मागणी करत मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात मंगळवार २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील माहेर असलेल्या रोहिणी निलेश पाटील यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील निलेश केसरसिंग पाटील यांच्याशी झाला आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली. तसेच लग्नात मानपान दिला नाही आणि माहेरहून हुंड्याचे पैसे आणावे अशी मागणी केली तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन काढून छळ केला. दरम्यान सासू-सासरे नणंद यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला हा छळ सहन झाल्याने विवाहिता धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती निलेश केसरसिंग पाटील, बेबाबाई केसरसिंग पाटील, सासरे केसरसिंग शंकर पाटील रा. सातखेडा ता.धरणगाव, ननंद सुनीता निलेश पाटील, निलेश रमाकांत पाटील दोन्ही रा. शिरपूर धुळे आधि नंनंद रूपाली दिलीप पाटील रा. लाडली ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोती पवार करीत आहे.