हिवरा नदीवर पूल बांधताना पर्यायी रस्ता देण्याची मागणी

 

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील हिवरा नदीवर पूल बांधताना पर्यायी रस्ता देण्याची मागणी करत १० दिवसात पर्यायी रस्ता न दिल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे

 

शहरातील हिवरा नदीवरील पुल तोडुन नविन पुल बनविण्याचे काम नुकतेच नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. परंतु हे काम करत असतांना नगरपालिका व संबंधित ठेकेदाराने नागरिकांना ये – जा करण्यासाठी कुठल्याही पर्यायी रस्त्याची व्यवस्था केलेले नसल्याने  संतप्त नागरिकांनी ए. एम. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व  वेब मिडीया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांचेकडे पर्यायी रस्ता करुन मिळावा याबाबत कैफियत मांडली  अनिल महाजन यांनी तात्काळ पर्यायी रस्त्याची व्यवस्था करुन देण्यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित ठेकेदाराला दहा दिवसांचा अल्टीमेन्टम दिला आहे. पर्यायी रस्त्या करुन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक न.पा प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील असे ते म्हणाले .

 

पाचोरा कुष्णापुरी हिवरा नदी पुलाचे उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत कुष्णापुरी, सिंधी कॉलनी, भैरव नगर, त्रंबक नगर, गुरुदत्त नगर भागातील रहिवाशांची शहरात जाण्यासाठी मोठी कसरत होत  आहे. न. पा. प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांनी कुठलीही पर्यायी व्यवस्था कच्चा रस्ता किंवा लोखंडी पूल पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी न बनवता हिवरा नदी वरील पुल तोडुन पुलाचे काम सुरू केले  शहरात जाण्याचा रस्ता पुर्णपणे बंद केलेला आहे. स्थानिक न. पा. प्रशासनाचे काय धोरण आहे ?  पावसाळयात पुल बांधणे हे पण जनहिताचे धोरण नाही. अशा आषयाचे निवेदन पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना दिलेले आहे. दहा दिवसात पर्यायी कच्चा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी तयार करून न दिल्यास त्यानंतर संबंधित ठिकाणी ए. एम. फाऊंडेशन च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशा इशारा ईमेल द्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात अनिल महाजन यांनी दिला आहे.

 

Protected Content