हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घ्यावे ; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या मृत्यू प्रकरणी हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घ्यावे, असे खुले आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

 

संजय राऊत पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे चांगले काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगले राजकारण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांनी जाहीरपणे त्यांचे नाव घ्यावे. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगले राजकारण नाही. कोणत्याही पक्षातील युवा नेत्यांचे खच्चीकरण केले जाऊ नये. एका उभरत्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय फायदा होणार आहे. हे राज्याचेच नुकसान आहे, असेही राऊत म्हणाले. चौकशीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, सत्य समोर आलं पाहिजे असं मलाही वाटते. सुशांत सिंह मुंबईचा मुलगा आहे. कोणी कितीही दावा केला तरी तो मुंबईचा आहे. त्याला न्याय देण्याची आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मुंबई पोलीस आणि सरकारचे ते दायित्व आहे.

Protected Content