नवी दिल्ली । देशातील हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्येचा कट दहशवाद्यांनी आखला असून याला पाकिस्तानातून पाठबळ मिळत असल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
पाकिस्तानने मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट केले आहे. याबाबत टाईम्स नाऊ या वाहिनीने वृत्त दिले आहे. पाकिस्तान भारतात राहणार्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून, हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत असल्याचे यात म्हटले आहे.
दरम्यान, यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे. या अलर्टनंतर या राज्यांतील गुप्तचर संस्थाही अलर्ट झाल्या आहेत. यानंतर गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री गोरधन जडफिया यांच्या हत्येच्या कथित कटाचा भांडाफोड करत एका शार्प शूटरला अटकही केली होती.