यावल : प्रतिनिधी । हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्रात आजादी का अमृत महोत्सवासंदर्भाने कुष्टरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत असंसर्गजन्यरोग जागरुकतेच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी तथा आशा कर्मचारी यांची बैठक पार पडली
तालुक्यात १ जुलै ते ३१ आँक्टोबंर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उप केद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे व क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे ,मिलिंद राणे यानी केले.
त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक घरोघरी कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. संशयीत रुग्ण आढळल्यास मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे. या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वंयसेविका व आरोग्य सेवक घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा, न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार आहेत .
त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेंमत बऱ्हाटे यांनी केले आहे.