जळगाव प्रतिनिधी । मानवतेला काळीमा फासणाऱ्या उत्तर प्रदेश हाथरस पिडीतेच्या मृत्यूची त्रिसदस्यीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी व दोषींना मृत्युदंडाची शिक्षेची मागणीसाठी आज आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आले. याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले
दिल्ली, कठुआ, हैदराबाद, उन्नाव व आता उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार नराधमांनी निष्पाप मुलीचे शेतातून अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडितेची जीभ छाटून, पाठीचा मणका मोडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून गळ्यात ३ फ्रॅक्चर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले. पंधरा दिवस मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. घटनेच्या निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यास व फक्त बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा आणि सामान्य जानतेला पोलिसांकडून झालेल्या मारहाण व धक्काबुक्की करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटील, ॲड. राजेश गोयर, मिनाक्षी चव्हाण, अकिल पटेल, संजय चव्हाण, जितेंद्र सरोदे, फिरोज शेख, जयश्री पाटील, प्रदीप भोळे, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, अनिरूध्द जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.