जळगाव, प्रतिनिधी । हाथरस येथील निर्भयावर अत्याचार करणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
दिल्ली, कठुआ, हैदराबाद, उन्नाव व आता उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार नराधमांनी निष्पाप मुलीचे शेतातून अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडितेची जीभ छाटून, पाठीचा मणका मोडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून गळ्यात ३ फ्रॅक्चर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले. पंधरा दिवस मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. राक्षसांना ही लाजवेल असे कौर्याची परिसीमा गाठणारी घटना असून या घटनेच्या निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता आज सै. नियाज भैय्या फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यास व फक्त बलात्कार प्रकरणी ईस्लामी शरियत ( इस्लामी कायदा) मृत्यूदंडाची शिक्षा करण्याकरिता कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी “फासी दो फासी दो गुन्हेगार को फासी दो, निर्भया के सन्मान में सभी भारतीय मैदान में, मुर्दाबाद मुर्दाबाद अत्याचारी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, शेख शफी, नाझीम पेंटर, सय्यद उमर, हाशिम कुरेशी, शेख झफर, झिशान हुसैन, शाकिब फारुख, तौसिफ कुरेशी, शेख सलीमुद्दिन, अश्फाख गफूर, आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2395648924064615