Home क्राईम हरीविठ्ठल नगर परिसरातील विवाहितेला अश्लिल शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

हरीविठ्ठल नगर परिसरातील विवाहितेला अश्लिल शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३० एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील एका भागात ३६ वर्षीय महिला ही पती व तीन मुलांसोबत वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३० एप्रिल रोजी विवाहिता ही मंदिरात गेली होती, दर्शन घेऊन घरी परत येत असताना त्याच गल्लीत राहणारा दिनेश रवींद्र बारी हा किराणा दुकानासमोर उभा होता. त्यावेळी विवाहिता पायी जात असताना त्याने तिचा रस्ता अडून तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या घरी येऊन पुन्हा तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात विवाहितेने पतीसोबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी १२ वाजता संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound