जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरजवळील पुलाजवळ एक जण सट्टा जुगार खेळविणार्यांवर रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्त वृत्त असे की, शहरातील हरिविठ्ठल नगर पुलाजवळ एक युवक सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती सपोनि राजेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ विजय खैरे, गोपाल चौधरी, उमेश पवार, रविंद्र चौधरी यांचे पथक तयार केले. या पथकाने पुलावजवळ जावून पाहणी केली असता. त्यांना याठिकाणी एक युवक सट्टा जुगार खेळवित असल्याचे दिसले. त्यांनी या सट्टा खेळविणारा कैलास सुभाष पाटील (३०, रा. खंडेरावनगर) व सट्टा खेळविण्यास प्रवृत्त करणारी आरती भिल्ल (३०, रा. हरिविठ्ठलनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ४९० रुपये रोख व सट्टा खेळविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोकॉ विजय खैरे यांच्या फिर्यादिवरुन मुंबई जुगार कायद्यांतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.