जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठलनगर परिसरातील एका ३८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनाने राजपूत गल्ली दार दिवसांपासून सील केली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या ३० गरीब कुटुंबांना अन्नधान्यवाचून हाल होत आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
हा परिसर सिल केल्यामुळे या गल्लीत राहणाऱ्या रहिवाशांना किमान अन्नधान्याची व्यवस्था शासन, लोकप्रतिनीधी आणि सामाजिक संस्थानी करावी अशी आर्त हाक येथील रहिवाशांनी केली आहे. हा भाग हातावर पोट असणाऱ्या सामान्य गरीब मजूर वर्गाचा असल्याने सर्वांचेच हाल होत आहे. त्यांना मदत करावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आणि आयटी सेल प्रमुख मिलिंद तायडे यांनी केली आहे.
राजपूत गल्लीत सर्वच हात मजूर आहेत प्लम्बर, मिस्तरी, गवंडी,वायरमन ,माळी, इत्यादी कामगार वर्ग पुरुष तर सर्वच महिला भांडी धुनी करून आपल्या आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे आहेत . धान्य मिळविण्यासाठी या प्रभागातील नगरसेविकांना कॉल करून देखील रेशनिंगचे धान्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी केली आहे. तसेच काहींकडे असणारे धान्य आणि पैसे संपल्याने त्यांच्यावर बिकट वेळ आली आहे . तरी प्रशासनाने येथील रहिवाशांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे . तसेच पाणीसुद्धा पुरेसे मिळत नसल्याची तक्रार रहिवाशांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे .