पुणे (वृत्तसंस्था) जुन्नर जवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडुन एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. मयत तरुणी शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आली होती.
मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता. आज सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास या गटातील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना माहिती दिली असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, य दुर्घटनेमुळे शिवजयंतीच्या उत्साहावर विरजण पडले आहे.