स्व.निखिल खडसेंना जयंतीनिमित्त अभिवादन 

 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | माजी जि. प. सदस्य आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणीचे चेअरमन स्व.निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने स्व. निखिल खडसे स्मृतीस्थळ येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रोहिणी खडसे, क्रिशिका खडसे, गुरुनाथ खडसे यांच्या हस्ते स्व निखिल खडसे समर खेवलकर, सारा खेवलकर यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी आदरांजली पर मनोगत व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले स्व. निखिल खडसे हे मनमिळाऊ आणि विनम्र व्यक्तिमत्त्व होते. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या कडे कुठलाही व्यक्ती कोणतेही काम घेऊन गेला तरी ते त्या व्यक्तीला मदत करायचे विरोधी पक्षातील व्यक्ती जरी त्यांच्याकडे काम घेऊन गेला तरी त्यांनी कधी काम करायला नकार दिला नाही.

निखिल खडसे हे जिल्हा परिषद निवडणुकीला उमेदवार होते त्यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्व युवराज काका पाटील हे उमेदवार होते.

त्या निवडणुकीत निखिल खडसे हे विजयी झाले. स्व. युवराजकाका आणि मी त्यावेळी तहसील कार्यालय आवारात उभे होतो. विजयी झाल्यानंतर निखिल हे स्व.युवराज काकांकडे येऊन त्यांनी युवराज काकांचा आशीर्वाद घेतला

अशा प्रकारे स्व. निखिल खडसे हे विनम्र व्यक्तिमत्त्व होते.

परंतु काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. स्व निखिलभाऊ हे मुक्ताई सूतगिरणीचे चेअरमन असताना त्यांच्या कार्यकाळात सूतगिरणीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. स्थानिक लोकांना महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न होते.

त्यांच्या पश्चात रोहिणी ताईंनी हे स्वप्न पुर्ण केले. स्व. निखिल भाऊ यांना काळाने आपल्यातुन हिरावून नेले तरी त्यांच्या पावन स्मृती आपल्या सर्वांच्या हृदयात जिवंत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, आबा पाटील, निवृत्ती पाटील, निलेश पाटील, कैलास सरोदे, विकास पाटील, दिपक पाटील, विलास धायडे, राजेंद्र माळी, रामदास पाटील, कैलास चौधरी, भागवत टिकारे, प्रदिप बडगुजर, विजय चौधरी, किरण वंजारी, प्रमोद शेळके, सतिष पाटील, दिपक वाणी, प्रदिप साळुंखे, अतूल पाटील, रामभाऊ पाटील, प्रविण पाटील, बापू ससाणे, विनोद सोनवणे, रणजित गोयनका, नंदकिशोर हिरोळे, शिवा पाटील, विकास पाटील, श्रीराम चौधरी, सुभाष घटे, बाळा भाल शंकर, दिपक साळुंखे, मधुकर गोसावी, वसंत पाटील, विशाल रोटे, लक्ष्मण भालेराव, रवींद्र पाटील, जे.के.चौधरी, कैलास कोळी, सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर, राहुल पाटील, निलेश भालेराव, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी, श्रीकांत चौधरी, शंकर मोरे, व्हि.सी.चौधरी, बालाभाऊ बोरले, भैय्या कांडेलकर, मयुर साठे, शुभम खंडेलवाल, डॉ. अभिषेक ठाकूर, अमित वाणी, रोहन महाजन, चेतन राजपूत, अजय अढायके यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content