जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,ओरीयन सीबीएसई स्कूल तसेच किलबिल बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिन प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आले.
सर्वप्रथम किलबिल बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संगीत शिक्षक प्रवीण महाजन यांनी ध्वज गीत सादर केले.
याप्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापिका डी.व्ही. चौधरी, मुख्या. संदीप साठे मुख्या.सुषमा कंची सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वकृत्व स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली “ए वतन वतन आबाद रहे तू……सारे जहासे अच्छा….. विजयी विश्व तिरंगा प्यारा …… नन्हा मुन्ना राही हु ……झेंडा आमचा प्रिय देशाचा ….असे एकापेक्षा एक सुंदर गीत विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.
गीत गायन स्पर्धेत प्रथम प्राची जितेंद्र कोतवाल, द्वितीय तेजस किशोर पाटील, तृतीय संस्कृती संदीप जोशी तर उत्तेजनार्थ समृद्धी महेंद्र गायकवाड यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे आयोजन उपशिक्षिका इंदू चौधरी यांनी केले तसेच त्यांना उपशिक्षिका चित्रा गुरव व चारुलता वायकोळे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षिका सरला पाटील यांनी केले.