रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका रेशन दुकानदाराला खोटे रेशन कार्ड बनवून करून शासकीय अधिकारी यांच्या बनावट सह्या करणे महागात पडले आहे. रावेर न्यायालयाने या दुकानदारा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून
संबधित आरोपीला दिनांक १ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
के-हाळा बु येथील रेशन दुकानदार दिगंबर रामचंद्र बाविस्कर यांनी शेत खरेदी करण्यासाठी खोटे रेशन कार्ड तयार करून त्यावर खोटे शिक्के करून शासकीय अधिकारी यांच्या बनावट सह्या असे दस्तऐवज करण्याच्या इराद्याने खोटे दस्तऐवज खरे आहे असे भासवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने बनावट रेशन कार्डच्या आधारे जमीन खरेदी केली असल्याची तक्रार फिर्यादी महेशचंद्र लोखंडे रा.रावेर यांनी दाखल केली होती. आरोपी हा शेतकरी नसताना त्याने शेती घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची फिर्यादी यांची तक्रार आहे. शेतीचे बाकीचा खरेदीचा नोंदणीकृत सौदे पावती रद्द मनाईहुकूमसाठी रावेर न्यायालयात दाव्यातील बनावट शिधापत्रिका चे दस्तऐवज पुरावा दाखल करून आरोपीताचे बनवत दस्तऐवज तयार करून त्यावर शासकीय अधिकारी यांचे खोटे सिक्के सहीचे बनावट दस्तऐवज फसवनुक करण्याच्या इराद्याने खरे आहे असे भासवून त्याचा वापर शासकीय कार्यालयात दस्तऐवज दाखल करून कब्जात ठेवला . अशी फिर्याद कोर्टात दिल्याने न्यायालयाने कलम १५६ ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींना न्यायालयाने १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे . यामुळे रेशन दुकानदार चालकानेच बनावट शिधापत्रिका तयार करून फसवणूक करीत आहेत.