स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) रस्त्यावर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

आज मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा नेहमी प्रमाणे सुरु असून जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदी आणि बँकांचे व्यवहार करण्यासाठी लोकं घराबाहेर पडले आहेत. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका, असे आवाहन केले आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद केली आहेत. परंतू रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचे चित्र आज सकाळी दिसत होते. मुंबईत अजूनही रस्त्यावर वर्दळ आहे. जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीही लोक घराबाहेर पडले आहेत.

Protected Content