यावल, प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावल शहराने चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याअनुषंगाने नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व अभियंता यांना दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान-२०२१ अंतर्गत कचरा मुक्त शहराची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील यावल शहराने चौथा क्रमांक पटकावला आहे. याबाबत सर्व स्तरातून शहराचे कौतुक होत आहे. दरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व पालिकेचे अभियंता योगेश मदने यांना आज २० नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत, केंद्र शासनाच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव, दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वच्छता भारत अभियांनाच्या सहसचिव रूपा मिश्रा यांचे उपस्थितीत विज्ञान भवनात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
तत्पूर्वी या स्पर्धेत शहरातील भौतिक व कागदोपत्री स्तरातील कामकाजाची तपासणी व मूल्यांकनासाठी शासनाने त्रिस्तरीय समिती नेमलेली होती. दरम्यान शहर स्वच्छतेबाबत चा केंद्र शासनाच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराने मला अत्यंत आनंद झाला आहे. या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय शहरवासीयं, नगरपरिषदेचे सफाई कामगार , व स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व मुख्याधिकारी , उपनगराध्यक्ष , व माझे सर्व सहकारी नगरसेवक बंधु–भगीनीना देत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी दिली आहे.