स्थायीच्या सभेत नितीन बरडे विद्युत विभागावर भडकले (व्हिडिओ)

जळगाव : प्रतिनिधी । स्थायी समितीच्या आजच्या सभेत महापालिकेचे विद्युत अभियंता एस एस पाटील  यांच्यावर ठपका ठेवत  नगरसेवक नितीन बरडे  यांनी पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामात निवडक लोकांसाठी काळजीपूर्वक काम केले जात असल्याचा आरोप केला.

स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत तीन विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या चर्चेत आरोग्य, रस्ते व पाणीपुरवठाच्या विषयांवर वादळी चर्चा झाली. याप्रसंगी अतिरिक्त  आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

शहरात बसविण्यात आलेले काही एलइडी नादुरुस्त  असल्याचा नगरसेवक नितीन बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास दिले असता सर्वक्षण करून बंद असलेले एलइडी ४८ तासात बदलविन्याच्या सूचना सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी विद्युत विभागाला दिल्यात. विद्युत अभियंता एस. एस. पाटील यांनी लवकरच एलइडी बंदची तक्रार निवारणासाठी  कॉल सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.  नगरसेवक प्रशांत नाईक यांनी त्यांच्या प्रभागात आमदार निधीतून देण्यात आलेले ५ हायमास्ट बंद असल्याची तक्रार केली. यावर नितीन बरडे यांनी संतप्त होऊन एस.एस. पाटील यांना तुमच्या घरासमोरील लाईट बंद झाला की लागलीच दुरुस्त होतो, हायमास्ट लॅम्प व तुमचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप नितीन बरडे यांनी यावेळी केला.

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असतांना आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला. शहरात फवारणी  व अॅबेटींग करण्यात येत नसल्याचा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर आरोग्य विभागाकडून फवारणी व अॅबेटींग करण्यात येत असून आम्ही नगरसेवकांच्या सह्या घेत असल्याचा सांगण्यात आले. याला विरोध करत माझ्या प्रभागात अॅबेटींग  करण्यात आले नसल्याची तक्रार उज्ज्वला बेंडाळे यांनी केली तर नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी फवारणी बाकी आहे असा रिमार्क लिहून दिला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

सफाई ठेकेदाराला पुरविण्यात येणार आलेल्या १३० गाड्यांचे इन्शुरन्स काढण्यात आले आहे का ? याची विचारणा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी  केली. यात ८५ गाड्याचा विमा संपला असल्याचे वाहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. विमा रक्कम ठेकेदाराने न भरल्याने त्याच्याकडून ती वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले. दुर्दैवाने विमा नसलेल्या गाडीचा अपघात झाला तर किती नुकसान होईल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

समता नगर परिसरातील स्टेट बँक कॉलनी येथे रात्री २ ते सकाळी ४ वाजे दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. येथे काही टार्गेट मुलांनी रात्री महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र वेळीच हस्तक्षेप केल्याने ते वाचले असल्याचे नितीन बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यापुढे रात्री पाणीपुरवठा करू नका असी सक्त ताकीद नितीन बरडे यांनी यावेळी दिली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे बाबा साळुंके यांनी यापुढे रात्री सप्लाय होणार नाही याची दक्षता घेऊ असे सभागृहास सांगितले. स्थायी समितीच्या चर्चेत उपमहापौर कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, नितीन बरडे, नवनाथ दारकुंडे, उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

दरम्यान, सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी आज  झालेल्या सभेबाबत सांगितले की, शहरातील सर्व  स्मशानभूमीमध्ये लाकडे व गोवऱ्या पुरविण्याचा ठेक्यास मंजुरी देण्यात आली. कोविड काळात काही कामगार पुरविण्याचा ठेक्याची मुदत सहा महिन्यापूर्वी संपलेली आहे. त्यावेळी त्यांना तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती, ती देखील संपली असून याला सुद्धा तीन महिने झाले आहेत. प्रशासनाकडून उशिराने प्रस्ताव येत असल्याने नाईलाजाने संबधित ठेकेदाराला मुदत वाढ द्यावी लागते, प्रशासनाला नवीन निविदा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेलेली जनावर उचलून नेण्याचे काम करणारी दोघा कंत्राटी कामगारांची मुदत संपत असून त्यांना देखील ६ महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/237781634864807

 

Protected Content