जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत कामगारांच्या अडचणींबाबत मा. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोंदणीसाठी https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजूर त्यांच्या मुळ राज्यात जाण्यासाठी इच्छूक असतील, अशा मजुरांनी या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.
जळगाव जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांच्या विविध प्रश्नांची व अडचणीची सोडवणूक करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे समुपदेशन/सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी/समस्या असतील त्यांनी कामगार कल्याण कार्यालयाच्या पत्यावर अथवा कार्यालयीन दुरध्वनी 0257-2239716 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.