चोपडा, प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी झुलवत ठेवणारे सरकार आजतागायत काहीही देवू शकलेले नाही.राज्यात महिलांवर होणारे अत्त्याचार दिवसागणिक वाढत आहेत. मात्र ‘तिन तिघाडा’ सरकार मागच्या भाजप सरकारचे जनहिताचे निर्णय केवळ स्थगित करण्याचा उपक्रम राबवीत असल्याने या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील सर्व तहसिल कचेरींवर भाजप धरणे आंदोलन करणार असल्याचे माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
म्हाळके पुढे म्हणाले की, भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडविस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची सध्याची भीषण अावस्था पाहून जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला असतांना शिवसेना मित्र पक्षाने तत्वांना तिलाजंली देवून महाराष्ट्रात तिन तिघाडा सरकार आणले आहे. अवकाळी पाऊसाचे प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये देण्याची तसेच संपूर्ण कर्जमाफीच्या घोषणा शिवसेना आणि आघाडीतील नेत्यांनी केल्या.शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची ग्वाही दिली. तथापि सरकारचे अनेक महिने गेल्यानंतर देखील पिक कर्जाची व्यतिरिक्त कोणतीच माफी अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदार शेतकऱ्यांना माफीचा लाभ दिला नाही. परंतु देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मदत केली. महाराष्ट्रात महिलांवरील अत्त्याचार वाढता आहेत. हिंगणघाट,मिरारोड व अौरंगाबाद येथे महिलांवर अत्त्याचार घडत असतांना कायदा सुव्यवस्था राहिली नाही.त्यामुळे गुन्हेगारंचे फावले आहे. त्यामुळे उद्या तहसील कचेरीवर धरणे आंदोलन करणार आहोत.त्यात नागरिक भाजप कार्यकर्ते बंधु भगिनी सहभागी होणार आहेत.शासनाला जाग यावी म्हणून जनतेने धरणे आंदोलनात सहभाग देण्याचे म्हाळके यांनी आवाहन केले आहे.
वारीस पठाणचा निषेध
शिवसेनेने स्व.बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडून केवळ मुख्यमंत्री पदासाठी तत्व गुंडाळून ठेवल्याने वारीस पठाण सारखे धर्मांध माजले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दांत आम्ही निषेध करणार असल्याचे सांगण्यात आले. हिंदु समाज जागृत होणे गरजेचे आहे. वारीस पठाणवर कायदेशीर कारवाई करावी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष पकंज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, रंजना नेवे, भारती क्षिरसागर, चंदाबाई पाटील, माधुरी अहिरराव, वंंदना पाटील, हनुमंत महाजन, देवाबापू पाटील, यशवंत जडे, मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे, लक्ष्मण पाटील, हेमंत जोहरी, तुषार पाठक, मोहित भावे, सुरेश चौधरी, गोपाळ पाटील, विशाल भोई, विशाल भावसार आदी उपस्थित होते.