पारोळा, प्रतिनिधी । स्त्री शक्ती हीच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडविणारी आहे. आजची स्त्री ही चुल व मुल यात न अडकणारी आहे. आजची स्त्री आधुनिक जगातील सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. जसे मुलांचे शिक्षण ,घरातील जेष्ठमंडळींचे आरोग्याची काळजी , सदैव पतीला सुख दुःखात मदत करणारी आहे. ती आधुनिक समाज परिवर्तनासाठी झटणारी एक नारी आहे. असे प्रतिपादन भारती चव्हाण यांनी महिला मेळाव्यात केले. नुकतेच पारोळा येथे माळी समाज मंगल कार्यालयात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधूबाई महाजन हया होत्या. तर प्रमूख अतिथी अमळनेर महिला माळी महासंघाच्या अध्यक्षा भारती चव्हाण, आशा माळी महिला मंडळ सदस्या, मनिषा महाजन, पारोळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंजली पवार, माजी नगराध्याक्षा मानिषा शिरोळे, नगरसेविका अल्का महाजन ,नगरसेविका सुनिता वाणी, नगरसेविका जयश्री बडगुजर, सामाजिक कार्यकत्या वर्षा पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी आशा महाजन या म्हणात्न्या की, महिलांनी नटून थटून मिरण्यापेक्षा जर आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले तर त्यांना शिक्षणाची गोडी लागेल. त्यांची चांगली प्रगती होईल. सामाजिक कार्यकत्या वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नगर पालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अंजली पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम उखाणे स्पर्धाचे आयोजित करण्यात आले होते. यात उपास्थित महिलांनी उत्स्फूर्तपण सहभाग घेतला. त्यानंतर गीतगायण स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजश्री विष्णू चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन बबिता उदय महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश्वरी महाजन, प्रतिभा महाजन, योगिता महाजन ,कल्पना महाजन, रंजना महाजन, मनिषा महाजन ,लता महाजन, निलीमा महाजन ,वैशाली महाजन, कविता महाजन, सीमा महाजन, प्रतिभा महाजन, संगिता महाजन ,खटाबाई महाजन ,शोभना महाजन आदींनी परिश्रम घेतले.