जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम समोरून एका एलआयसी एजंटची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात गुरुवार २९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद मुरलीधर मुसळे (वय-४६) रा. चंद्रप्रभा कॉलनी, जळगाव हे एलआयसी एजंटचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २६ डिसेंबर रेाजी सायंकाळी ७ वाजता ते दुचाकीने जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील एसएस मोबाईल सेंटर समोर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेण्याची घटना समोर आली. त्यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरुवारी २९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहे.