जळगाव, प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटीज मूळजी जेठा महाविद्यालय द्वारा संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ नॅचरोपॅथी द्वारा योगिक सायन्स पदव्युत्तर अभ्यासक्रमा अंतर्गत ‘द आर्ट ऑफ बॅलान्सिंग’ या सात दिवसीय योग जनजागृती कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. यात सह्भागीकडून योगसाधना करून घेण्यात आली.
दि. १६ ते २२ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या योग जनजागृती कार्यशाळेत शरीर, मन आणि आत्मा यांचा एकत्रित विकास घडवून आणण्यासाठी उपयुक्त अशी योगसाधना योग प्रशिक्षणार्थी अनुराधा सोमवंशी यांनी करवून घेतली. या कार्यशाळेतून योगसाधनेचे महत्व पटवून देण्यात आले. या कार्यशाळेसाठी अनुराधा सोमवंशी यांना योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार आणि प्रा. गीतांजली भंगाळे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेत योगासने, प्राणयाम, सूक्ष्म व्यायाम, योगिक श्वसन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळा ऑनलाईन असल्यामुळे देशातीलच नव्हे तर विदेशातील सुद्धा काही साधकांनी या कार्यशाळेत सहभागी होवून लाभ घेतला. कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.