यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर आता आयटी ॲक्ट नुसार कडक कारवाई होणार आहे अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी दिली. यावल पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावल शहरातील प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सव, दोन दिवस ओढल्या जाणाऱ्या बारागाडया, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व मुस्लिम बांधवांची रमजान ईद या सर्व सणाच्या पार्श्वभुमीवर यावल येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
अल्पवयीन मुलांमध्ये कळत नकळत सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे धार्मीक पोस्ट, स्टेटस दोन समाजामध्ये द्वेष पसरवुन तेढ निर्माण करणारे व दुसऱ्या समाज मनाच्या भावना दुखावणारे पोस्ट आपल्या मोबाइल व्दारे टाकणे आदी विषयांवर आता आयटी कायद्याच्या कलम अन्वये कारवाई होणार असून ,तरी देखील जागृत पालकांनी आपल्या मुलांवर मोबाइलचा वापर करतांना नजर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मार्गदर्शन विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी सांगितले.
या बैठकीला पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे, राखीव पोलीस दलाचे पोतीस उप निरिक्षक प्रविण उमाळकर, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह विविध गावातील पोलिस पाटील, शहरातील शांतता समितीचे सदस्य चंद्रकांत देशमुख, प्रा. मुकेश येवले, गोपाळसिग पाटील, हाजी गफ्फार शाह, रहीम रजा, एम.बी. तडवी, डॉ.निलेश गडे, अरूण गजरे, अशोक बोरेकर, चेतन अढळकर, अ.करीम मन्यार, नितिन सोनार, नईम शेख, हकीम शेख, पप्पु जोशी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते .
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , अरूण गजरे यांनी येणारे श्री बालाजी रथोत्सव ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती , रमजान ईद हे सर्व धार्मिक सण सर्वसमाज बांधवांनी एकत्र मिळुन साजरे करावे असे आवाहन करण्यात आले.