Home आरोग्य सोशल मीडियावरचा दोन दिवस बंदचा संदेश फक्त अफवा!

सोशल मीडियावरचा दोन दिवस बंदचा संदेश फक्त अफवा!

0
40

 

 

  चाळीसगाव: प्रतिनिधी ।  गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर चाळीसगाव शहरात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. असा संदेश वायरल झालेला असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे शासकीय आदेश नसून ही अफवा असल्याचे तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे.

 

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन चाळीसगाव शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस बंद पाळण्यात येणार आहे. असा संदेश सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवला जात असलेला हा संदेश फक्त अफवा आहे. असे तहसीलदार अमोल मोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणीही सोशल मीडियावर विश्वास ठेवून बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र कोरोनाला हरवून लावण्यासाठी चाळीसगावातील जनतेने स्वयंस्फूर्तीने हे दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्यास प्रशासन त्याचे स्वागतच करेल. असे सुतोवाच प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound