सोशल मीडियातील अफवाबाजांना आळा घालण्याची मागणी

जामनेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूबाबत अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

कोरोनाबाबत सोशल मीडियात अनेक फेक मॅसेज फॉरवर्ड केले जात आहेत. यातच जामनेरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून त्यांना रुग्णालयात भरती केले आहे. दोघांना उद्या मुंबई येथे हलवण्यात येणार असल्याचा मेसेज शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. जामनेरात सूरज अशोक न्हावी व रोहित संतोष माळी या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. या मेसेजखाली डॉ.अमोल कोल्हे यांच्या नावाचा संदर्भ दिला आहे. हा मेसेज व्हायरल होताच तालुका डॉ.राजेश सोनवणे यांना अनेकांनी विचारणा केली. मात्र, सूरज न्हावी व रोहित माळी अशा नावाच्या व्यक्ती जामनेरात नाहीत. यामुळे अशा प्रकारे अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन शनिवारी रात्री जामनेर पोलिसांना देण्यात आले. यावेळी डॉ.सोनवणे यांचेसोबत डॉ.नरेश पाटील, डॉ.राहुल वाणी, व्ही.एच.माळी, विजेंद्र पवार, अरूण चौधरी, गोपाळ पाटील उपस्थित होते.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content