जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी करातांना नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले.
मुस्लीम बांधवाची जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बैठक
सोमवार २५ मे रोजी रमजान ईद असल्याने त्यापार्श्वभूमीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आज सकाळी ११ वाजता मुस्लीम बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल, शनी पेठचे विठ्ठल ससे, शहरचे निरीक्षक अरुण निकम, एमआयडीसीचे निरीक्षक विनायक लोकरे, तालुक्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे, रामानंद नगरचे निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह मशिदीचे मौलाना मौ.जाबीर, आसीफ खान, मौ.मोहम्मद रेहान, जमिल शेख, फारुक शेख व इतर मुस्लीम बांधव उपस्थित होते.