सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती !

मुंबई (वृत्तसंस्था) सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी नवे पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी वळसे पाटील पालकमंत्रिपदाबाबत फार इच्छुक नव्हते. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा त्यांनी जिल्हा दौरा केला होता. दरम्यान, सध्या करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे युध्दपातळीवर प्रयत्न होत असताना मंगळवारी अचानकपणे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Protected Content