सोमवारी आशा व गटप्रवर्तक स्त्री परिचरांचे आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या मागणीकरिता जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक  कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर सोमवार दि. २९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

 

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक जिल्हा शाखा जळगाव जिल्हाचे वतीने आशा व गटप्रवर्तकांचा  २९  ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन पुकारण्यात आले  आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक  कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक यांचे मार्चपासूनचे मानधन,  मोबदला, कोविड  भत्ते, प्रोत्साहन भत्ते, थकीत असून ते मिळावेत. मोबाईल रिचार्ज दर तीनशे रुपये करावेत. अंगणवाडी आशा वर्कर यांना अँड्रॉइड मोबाईल पुरवावेत. ते मिळेपर्यंत आशा गटपरवर्तक स्वतःचे मोबाईल वापरतात म्हणून त्यांना दरमहा दोनशे रुपये भाडे देण्यात यावे. टीएडीए देण्यात यावे.  जिओ ट्रकर ची सक्ती बंद करावी. या स्थानिक मागण्यासह सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सवलती द्याव्यात त्याचे प्रमाणे विना मोबदल्याची काम सांगू नये, आरोग्य खात्यात रिक्त जागा रिक्त जागा पदी अशा व गटप्रव्रतकांना जागा राखून ठेवाव्यात. स्त्री परिच र यांचे थकीत मोबदला मिळावा आदि मागण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले असून या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक स्त्री परिचय यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन त्याचप्रमाणे जिल्हा संघटक सुलोचना साबळे मालू नरवाडे मीनाक्षी सोनवणे मीनाक्षी सोनवणे मनीषा पाटील शिवबा पाटील  रंजना सांगोरे सुरेखा महाजन कल्पना महाले जोत्सना खंबायत, शारदा महाजन मुक्ता महाजन म गायकवाड प्रतिभा नेहेरकर प्रतिभा पाटील, शालिनी पाटील ,विद्या पाटील, ठाकरे मॅडम ,अर्चना पाटील, नीता महाजन, कविता सरोदे ,नाजीम बी ,संजना गोडघाटे, पल्लवी पाटील, गोजर पाटील, ज्योती कापूरे मिणा महाले, हसीना तडवी, विद्यादेवी बाविस्कर   आदींनी केले आहे.

Protected Content