भडगाव : प्रतिनिधी । राज्यातील सर्व सलुन व्यवसाय पुर्ववत सुरु करू द्या व वैजापुर ( ता. चोपडा ) येथिल आत्महत्याग्रस्त गणेश सैंदाणे यांच्या कुंटुबीयाना आर्थिक मदत द्या. या मागणीसाठी येथिल नाभिक समाज मंडळाच्यावतीने तहशिलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सलुन बंदबाबत आदेश दिला आहे. यामुळे नाभिक बांधव कुंटुंबाना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असल्याने काही नाभिक बांधव अत्महत्या करीत आहेत या . पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सलुन दुकाने पुर्ववत तात्काळ सुरु करण्यास परवानगी द्यावी. चोपडा तालुक्यातील वैजापुर येथिल नाभिक बांधव गणेश सुभाष सैदाणे याने सलुन व्यवसाय बंद असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुंटुबप्रमुखाने अत्महत्या केल्याने सैदाणे कुंटुब उघड्यावर पडले आहे. या कुंटुंबास आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे व जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे यांच्या आदेशाने भडगाव येथिल संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने तहशिलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारीणी सदस्य शिवाजी शिरसाठ, राजेद्र सोनवणे, काशिनाथ शिरसाठ, सुभाष ठाकरे, राजेद्र महाले, प्रभाकर नेरपगारे, निलेश महाले, संजय शिरसाठ, नंदु ठाकरे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.