जळगाव, प्रतिनिधी | कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग व राष्ट्र सेविका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा वस्ती विभाग हरी विठ्ठल नगर येथे माता बालक प्रबोधन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत मुला-मुलींच्या बुद्धीला आणि शरीराला चालना देणारे, मन उत्साही करणारे खेळ स्मिता पिल्ले यांनी तसेच योगासन, देशभक्तीपर गीत आणि सोबत मुलांच्या आहार संबंधी मार्गदर्शन केले. तसेच मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी शरयु विसपुते यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अंजली हांडे, प्रास्ताविक लीना नारखेडे तर आभार मनिषा खडके यांनी मानले. कार्यशाळा यशस्वितेसाठी स्नेहा तायडे, मंगला अहिरे, ज्योती बारी, कांचन सांगोळे, राधिका गरुड यांनी परिश्रम घेतले.